सुशील मोरे पोलीस उपनिरीक्षक; गृह विभागाच्या आदेशानुसार पदोन्नती

सुशील मोरे पोलीस उपनिरीक्षक; गृह विभागाच्या आदेशानुसार पदोन्नती


पनवेल,दि.३१ (वार्ताहर ) : नवी मुंबई पोलीस मुख्यालय मध्ये कार्यरत असणारे सुशील बाळकृष्ण मोरे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार नवी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणाऱ्या 60 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. त्यामध्ये मोरे यांचा समावेश आहे.

      भारतीय सैन्य दलामध्ये कॅप्टन पदापर्यंत पोहोचलेले बाळकृष्ण मोरे यांचे चिरंजीव सुशील मोरे यांना बालपणापासून वर्दीची आवड होती. आपल्या  वडीलांना  सैन्यदलामध्ये उच्च पदावर देशसेवा बजावताना त्यांनी पाहिले. त्यामुळे भारतीय लष्करात किंवा पोलीस खात्यामध्ये काम करण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. 1988 साली सुशील मोरे पोलीस भरती झाले. आणि आपले स्वप्न सत्यामध्ये उतरवलं; सुरुवातीला ठाणे येथे त्यांनी कर्तव्य बजावले. त्यानंतर 1992 ला सुशील मोरे हे नवी मुंबई पोलिस दलामध्ये रुजू झाले. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी नोकरी केली. पनवेल शहर वाहतूक शाखेचे मध्येही मोरे कार्यरत होते. वाहतूक नियमन करण्यामध्ये त्यांचा हातखंडा राहिलेला आहे. त्याचबरोबर गुन्हे अन्वेषण आणि गुन्हे प्रगटीकरणांमध्ये ही त्यांनी तपास अधिकाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले. विशेष शाखेमध्ये सुद्धा मोरे यांनी कर्तव्य बजावले. गेल्या आठ वर्षांपासून ते नवी मुंबई पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. दांडगा जनसंपर्क असलेल्या सुशील मोरे यांनी आपल्या नोकरी काळामध्ये कायम सोशल पोलिसिंग वर भर दिला. अधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. यापुढील काळामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही ते आपली  कर्तव्यदक्षता आणि कार्यक्षमता सिद्ध करतील असा विश्वास पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image