आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.21 जून रोजी अलिबाग पोलीस परेड ग्राऊंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.21 जून रोजी अलिबाग पोलीस परेड ग्राऊंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन


   अलिबाग, दि.17 (जिमाका):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.21 जून 2022 रोजी सकाळी 07.30 वाजता, केंद्रीय संचार विभाग, प्रादेशिक कार्यालय, अहमदनगर, महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे अलिबाग येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे एका विशेष प्रचारात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये योग अभ्यासक, मार्गदर्शन, रॅली व महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. 

     सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन्स, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र यांच्यासह प्रिझम सामाजिक विकास संस्था, श्री अंबिका योग कुटीर, ठाणे यांचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.



Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image