नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाचा उद्या कोंकण भवनमध्ये दौरा


नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाचा उद्या कोंकण भवनमध्ये दौरा


 अलिबाग, दि.24 (जिमाका) : नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हा आयोग उद्या बुधवार, दि. २५ मे २०२२ रोजी कोकण विभागीय कार्यालयात दु. २.३० ते ४.३० या वेळेत भेट देणार आहे. यावेळी नागरिकांना निवेदने देता येतील.

      राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागास वर्ग (ओबीसी) , व्हीजे एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी हा समर्पित आयोग विभागनिहाय भेटी देत आहे.

     त्यानुसार, कोंकण विभागात उद्या दि. २५ मे  रोजी आयोगाची भेट होणार आहे. कोंकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दु. २.३० ते ४.३० या वेळेत नागरिकांना आयोगाची भेट घेता येईल.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image