बंद असलेल्या सोनबा येलवे पाणपोईची विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केली पाहणी, सुरू करण्याची केली मागणी

बंद असलेल्या सोनबा येलवे पाणपोईची विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केली पाहणी, सुरू करण्याची केली मागणी 



नवीन पनवेल : गेल्या काही दिवसापासून पनवेल एसटी डेपो समोरील पनवेल महानगरपालिकेची सोनबा येलवे पाणपोई बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना सद्याच्या वाढत्या तापमानामुळे नाईलाजास्तव पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. या ठिकाणी संबंधित विभागातील अधिकारी अविनाश पाटील यांना बोलावून विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी पाणपोईची पाहणी केली. 

        यावेली प्रितम म्हात्रे यानी पाणपोईचे तुटलेले नळ त्वरित बदलण्यास सांगितलेपाणी साठवण करण्यासाठी स्टोरेज टँक नसल्यामुळे नळाला सतत पाणी येत नसल्याने ताबडतोब स्टोरेज टाकी बसविण्याच्या सूचना केल्या. तसेच या ठिकाणी अस्वच्छता ही दिसत आहे ती त्वरित स्वच्छ करण्यास सांगितली. सदर पाणपोई स्वच्छ करून तेथील ड्रेनेजचे पाणी निचरा होण्यासाठीची पाईपलाईन सुद्धा बदलण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी सांगितले.

           अचानकपणे पनवेल एसटी स्टँड समोरिल पाणपोईला विजिट देऊन पाणपोईची समस्या प्रितम म्हात्रे यांनी निकाली काढली आहेपुढील दोन-तीन दिवसातच पाणपोई सुरळीत सुरु होईल,जर पालिकेने केले नाही तर स्वखर्चाने आम्ही आमच्या जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून नागरिकांची समस्या निवारण करू असे प्रितम दादांनी सांगितले आहे.


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image