पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा वाढदिवस अन्नदानाने उत्साहात साजरा

पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा वाढदिवस अन्नदानाने उत्साहात साजरा





उरण दि 17(विठ्ठल ममताबादे ) पत्रकार, पोलिसमित्र, सामाजिक कार्यकर्ते, लेखक म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुपरिचित असलेले पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा वाढदिवस दिनांक 17/5/2022 रोजी उरण चारफाटा येथे  झोपडपट्टीतील लहान मुलांना अन्नदान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसा निमित्त अन्नदान करून पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा वाढदिवस साजरा केला जातो. यंदा वाढदिवस अन्नदान करून साजरा करण्यात आला.

सुफल आहार या संस्थेच्या माध्यमातून दररोज चारफाटा उरण येथील मुलांना एकवेळचे दुपारचे पौष्टिक अन्न दिले जाते. समाजातील अनेक नागरिक, विविध सामाजिक संस्था येथे अन्नदान करीत असतात. पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या माध्यमातून वाढदिवसा निमित्त एका दिवसाचे एकवेळचे दुपारचे जेवण लहान मुलांना देण्यात आले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष विकी पाटील, उत्कृष्ट समलोचक सुनिल वर्तक, सदस्य -अभय पाटील,सादिक शेख, सागर घरत,गणेश ठाकूर, सुफल आहाराचे विकास शर्मा, स्मिता नाखवा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.अनेक नागरिकांनी, विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी सोशल मीडियाद्वारे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image