लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे लोकार्पण व साहित्य वाटप कार्यक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे लोकार्पण व साहित्य वाटप कार्यक्रम 



पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे लोकार्पण व साहित्य वाटप कार्यक्रम ०१ जून रोजी रात्री ८. ३० वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. 
         भाजपच्या नगरसेविका सुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून बांठिया हायस्कूल, दत्त मंदिर व कालिका माता मंदिर सेक्टर १३ आणि १४ येथे उभारण्यात आलेल्या तीन हायमास्टचे लोकार्पण, सीकेटी विद्यालय जवळील मँगो गार्डनमध्ये तसेच सेक्टर १३ मधील शिव मंदिर जवळील टेकडी गार्डन येथे ओपन जिमचे लोकार्पण, त्याचबरोबर डस्टबीन आणि प्रभाग १७ मध्ये बेंचचे वाटप करण्यात येणार आहे. 
        नगरसेविका सुशीला घरत यांच्या नवीन पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर डॉ. कविता चौतमल, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल घरत, प्रभाग समिती सभापती वॄषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, समीर ठाकूर, तेजस कांडपिळे, संतोष शेट्टी, मनोज भुजबळ, नगरसेविका चारूशिला घरत, राजेश्री वावेकर, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, के. डी. म्हात्रे, रविद्र भगत आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नगरसेविका सुशीला घरत, डॉ. अस्मिता घरत यांनी दिली आहे.                                     

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image