*भेटून जा एकदा*

 *भेटून जा एकदा*




भेटून जा एकदा बोलल्यावर

लगेच आलीस तू भेटायला

माझी‌ गरिब परिस्थिती पाहून

लागली तू मला दूर करायला


तुझी माझी भेट झाल्यानंतर

आपल्यात होत आहेत वाद

समजून न घेता तू माझ्याशी

पहिल्यासारखा नाही करत संवाद


भेटून जा एकदा असं बोलणं

मला महाग पडून गेलं वाटतयं

तुझ्या माझ्या नात्यातील प्रेम

आता कमी झाल्याचं कळतंय


आपलं फोन मेसेजवर बोलणं

प्रेमात गोडवा आणणारं‌ होतं

काय माहीत भेट होऊन आपलं

नातं तूटत जाईल हे माहीत नव्हतं


कोणीच भेटून जा एकदा असं

बोलून चुक नका करू आयुष्यात

कारण त्या भेटीमुळे पवित्र नातं

तुटलं तर पस्तावाल भविष्यात


*सचिन पाटील*

*(अलिबाग)*

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image