सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पनवेल येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

                                                        

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पनवेल येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु


अलिबाग, दि.24 (जिमाका): सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हे सेक्टर 10, प्लॉट नं.21 ग्रीन पार्क सोसायटी समोर कळंबोली,  ता.पनवेल, जि. रायगड येथे कार्यरत आहे. 

      या वसतिगृहामध्ये इयत्ता 8 ची पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक,उकडलेली दोन अंडी, सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच  भोजन व्यवस्थेमध्ये जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. 

अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील  विनामुल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून रु.600/- निर्वाहभत्ता दिला जातो.  शालेय विद्यार्थीनींना रुपये 1 हजार व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना रुपये 2 हजार गणेश भत्ता दिला जातो. सर्व विद्यार्थीनींना छत्री, रेनकोट व गमबुटसाठी रु.500/- भत्ता दिला जातो.  तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्य भत्ता रुपये 4 हजार व प्रोजेक्ट भत्ता रुपये 1 हजार दिला जातो. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रिडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत. 

      प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु.जमाती विद्यार्थींनीकरिता रुपये 2  लाख 50 हजारचे आत, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग, विद्यार्थीनींकरिता रुपये 1 लाखाच्या आत असावे.

ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2022-23 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र,  मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक, आधारकार्ड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत.

       सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहेत. अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पनवेल श्रीमती एम.जे.नरहरे यांच्याशी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल श्रीमती एम.जे.नरहरे यांनी केले आहे.


Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image
नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन
Image