कळंबोली येथील खिडुकपाडा परिसरात वाढतोय वेश्याव्यवसाय

 कळंबोली येथील खिडुकपाडा परिसरात वाढतोय वेश्याव्यवसाय


पनवेल : कळंबोली येथील खिडुकपाडा जवळील रस्त्यावर उभ्या कंटेनरच्या मागे रात्री मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु आहे. याचा त्रास सामान्य नागरिक तसेच येथील महिलांना होताना दिसत आहे.

            पनवेल शहर तसेच तालुक्यात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे काही गावांमध्ये लोकवस्ती वाढत असताना वेश्यांची वस्ती देखील वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहराच्या अनेक गजबजलेल्या भागात वेश्या उघडपणे रस्त्यावर गि-हाईक शोधत उभ्या असतात. यामुळे सर्वसामान्यांची मोठी कुचंबणा होत आहे. कळंबोली-खिडुकपाडा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या कंटेनरच्या मागे वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे सर्व तृतीयपंथी असल्याचे बोलले जात आहे. सायंकाळी ७ च्या नंतर हा खेळ या ठिकाणी सुरु होतो. अनेक आंबट शौकीन या ठिकाणी उभे असतात. रस्त्यावर हा प्रकार सुरू असल्याने अनेकाना माना खाली घालून येथून जावे लागते. मात्र कळंबोली पोलिसांकडून या प्रकाराकडे कोणतीही कारवाई केली जात नाही. अनेक ठिकाणी या वारांगना उभ्या असतात. मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. वारंवार पोलिसांकडे तक्रारी करून देखील पोलीस कारवाई करत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. 

Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image
नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन
Image