विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी शहरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची व मान्सून पूर्व उपाययोजनांची पाहणी

विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी शहरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची व मान्सून पूर्व उपाययोजनांची पाहणी



पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन पनवेल शहरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची व मान्सून पूर्व उपाययोजनांची पाहणी केली. 

       पाहणी दरम्यान छत्रपती संभाजी महाराज क्रीडा मैदान विकास कामाच्या येथे लेदर क्रिकेट पिच तयार करण्याबाबत सूचना केली. लेदर क्रिकेट सामन्याच्या वेळी सुरक्षतेच्या दृष्टीने अग्निशामक केंद्र आणि त्याच्या विरुद्ध दिशेला मैदानाच्या बाजूने दोन्ही बाजूला नेट लावणे आवश्यक आहे हे सुचविले.
      मांडवकर वाडा येथील फूटपाथ आणि अंतर्गत ड्रेन स्वच्छतेची पाहणी केली. नागरिक उघड्यावर कचरा टाकतात त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी उपाय योजना करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.
         पाहणी दरम्यान पाडा मोहल्ला येथील गटार आणि नाले सफाई तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी  योग्य पद्धतीने सफाई करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
          पनवेल भाजी मार्केट जवळील जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज स्मारक येथील झालेल्या विकास कामांची पाहणी आणि पावसाळ्यामध्ये तेथील पाणीनिचरा होण्यासाठी तेथील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या प्रकारे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. संत श्री तुकाराम महाराज स्मारकाच्या येथे सुरक्षितता आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीने  एस.एस. ची रेलिंग करणे गरजेचे होते ते काम त्वरित करण्यास सांगितले.
        या पाहणी दौऱ्या दरम्यान विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्यासह नगरसेवक श्री.गणेश कडू, मा.नगरसेवक श्री.डी. पी.म्हात्रे, पालिका कार्यकारी अभियंता श्री.संजय कटेकर , उपअभियंता श्री.सुधीर साळुंके , आरोग्य अधिकारी श्री.शैलेश गायकवाड, प्रभाग अधिकारी श्री.अमर पाटील स्वच्छता निरीक्षक कु जयेश कांबळे व तसेच पालिका कर्मचारी व माझे सहकारी यावेळी उपस्थित होते.
Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image