तरुणी बेपत्ता

 तरुणी बेपत्ता


पनवेल दि.२२ (वार्ताहर) : एक १९ वर्षे मुलगी ही तिच्या लहान बहिणीस शाळेतून घेवून येण्याच्या  बहाण्याने राहत्या घरातून बाहेर पडून लहान बहिणीच्या शाळेसमोरून कोणास काही न सांगता स्वतहून निघून गेल्याने याबाबतची तक्रार तिच्या कुटुंबियाने कळंबोली पोलिस ठाण्यात दिली आहे. 

कु. प्रतिभा राजेश कुशवाह (वय १९, राहणार - सेक्टर-१, कळंबोली) असे या मुलीचे नाव असून तिचा रंग सावळा, उंची ५ फुट, बांधा-सडपातळ, केस काळे व लांब कंबरेपर्यंत, डोळे काळे, चेहरा उमट, पेहराव गुलाबी रंगाचा कुर्ता, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, व काळ्या रंगाची ओढणी, नाकात नथणी घातलेली आहे, पायात चप्पल, ओळखीचे चिन्ह डाव्या हाताच्या मनगटावर जुना कापल्याचा व्रण आहे. तिला मराठी, हिंदी बोलता येते. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलिस ठाणे किंवा पो.ना. किशोर म्हात्रे यांच्याशी संपर्क साधावा. 


Popular posts
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image