शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी बबनदादा पाटील

 शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी बबनदादा पाटील


पनवेल / प्रतिनिधी  :-  मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी बबनदादा पाटील यांची ( पनवेल, उरण, कर्जत विधानसभा) नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

      बबनदादा हे गेल्या २६ वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते तर सध्या ते रायगड जिल्हा सल्लागारपदी नियुक्त होते, तसेच अत्ता ते दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पनवेल , उरण , कर्जत विधानसभा संपर्कप्रमुखपदी नेमणूक करून मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

    त्यांच्या या नियुक्तीमुळे सर्व स्तरावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून नागरिकांमध्ये तसेच शिवसैनिकांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image