रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेलमध्ये; ७७०० कोटी रुपयांच्या 'एक्सप्रेस वे' विकास कामांचे होणार लोकार्पण आणि भूमिपूजन

पनवेल, उरण, चौककरांना गुढीपाडव्याची विकास भेट; रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेलमध्ये; ७७०० कोटी रुपयांच्या 'एक्सप्रेस वे' विकास कामांचे होणार लोकार्पण आणि भूमिपूजन 



पनवेल(प्रतिनिधी) पनवेल व उरण तालुक्यातील ७७०० कोटी रुपयांच्या 'एक्सप्रेस वे' विकास कामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन रविवार दिनांक ०३ एप्रिल रोजी सायंकाळी ०५ वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. 
           नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ चिंचपाडा गाव येथे हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, खासदार कुमार केतकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, खासदार राजन विचारे,  आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयंत पाटील, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील, यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. 
         पनवेल व उरण तालुक्याच्या जनतेला उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाचा रस्ता मिळावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जेएनपीटी उरण ते पनवेल रस्त्याची मागणी व पाठपुरावा केला होता, त्यानुसार ३५०० कोटी रुपयांचा जेएनपीटी पोर्ट रोड पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण होणार आहे. कळंबोली येथील जंक्शनच्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने ८०० कोटी रुपयांचा कळंबोली जंक्शन विस्तारीकरण प्रकल्प होणार असून त्याचे भूमिपूजन होणार आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराचा भूमिपूजन होणार आहे. त्याचबरोबर उरण-जेएनपीटी-चौक या ३००० कोटी रुपयांच्या नवीन महामार्गाची घोषणा यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. पनवेल, उरण आणि चौक परिसराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे विकासकामे होणार आहेत. त्यामुळे इंधन व वेळेची बचत, वाहतूककोंडी आणि अपघातापासून मुक्ती, सहज आणि सोपा प्रवास तसेच उद्योगधंदे व व्यापाराला चालना मिळणार आहे. 



Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
पनवेल मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचा मोठा उपक्रम : ४ हजाराहून अधिक महिलांना मिळणार शिलाई व घरघंटी मशीन
Image