ड्रोन सर्व्हेला नैना प्रकल्पबाधीत शेतकरी उत्कर्ष समितीचा विरोध

 ड्रोन सर्व्हेला नैना प्रकल्पबाधीत शेतकरी उत्कर्ष समितीचा विरोध

नवीन पनवेल : ड्रोनद्वारे होणाऱ्या मुळ गावठाणच्या  सर्व्हेला नैना प्रकल्पबाधीत शेतकरी उत्कर्ष समितीने विरोध दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन समितीने जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, भूमि अभिलेख, तहसीलदार, बिडीओ, याना दिले आहे.

           पनवेल तालुक्यातील १३८ गावातील मुळ गावठाणाची ड्रोनद्वारे  सर्व्हे करण्यात ये आहे. परंतु या  सर्व्हेबाबत स्थानिक रहिवासी यांना याबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही, परंतु स्वांतत्र काळापासुन वाढती लोकसंख्या यांचा विचार करून शासनाने विस्तारीत गावठाण दिलेला नाही. म्हणुन स्थानिक रहिवाशी शेतकरी यांनी गावठाणाबाहेर व शेतावर आपल्या उदरनिर्वाहासाठी घरे, गोठे, चाळी, बिल्डीग बांधलेल्या आहेत. तसेच गावालगत असलेली गुरचरण व फॉरेस्ट या जागा स्वतंत्र काळापासुन रहिवासी शेतकरी या जागेमध्ये गुरे, शेळया, मेंढया चरण्यासाठी व अनेक नैसर्गिक गरजा भागविण्यासाठी याचा वापर पिढ्यानपिढया करत आहे. तरी या संबंधीत शासन व प्रशासन यांनी अगोदर सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे. असे समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु तसे न करता ड्रोनद्वारे सर्वे करत आहात. त्याला आमचा विरोध असल्याचे समितीने म्हटले आहे. तरी मुळ गावठाणाबाहेरची घरे, चाळी, बिल्डींग त्यांना कसे सामाहून घेणार आहात याचा गोदर खुलासा करणे गरजेचे आहे व गुरचरण, फॉरेस्ट या जागा विस्तारीत गावठाणासाठी मिळाव्यात व सर्व्हेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी. अन्यथा स्थानिक रहिवाशी, शेतकरी, व्यासायिक हे आंदोलन रतील असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.



      
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image