संतोष घरत रायगड भूषणने सन्मानित

 संतोष घरत रायगड भूषणने सन्मानित


पनवेल/प्रतिनिधी-  लहान पणापासून संगीत क्षेत्राशी नाळ जोडलेल्या संतोष घरत यांना नुकतेच रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.घरत हे संगीत विशारद असुन सुमारे 28 वर्षापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.

      आजवर घरत 15 पेक्षा जास्त भजनी मंडळात आपला सक्रिय सहभाग नोंदवून विविध कार्यक्रमात सहभागी होत असतात.संगीत क्षेत्रातील जिल्ह्यातील नामवंत गायक,संगीतकार यांच्या सोबत विविध सार्वजनिक कार्यक्रमात घरत यांनी सहभाग घेऊन आपल्या संगीताचे कलाविष्कार सादर केले आहेत.घरत हे पळस्पे(गणेशवाडी)याठिकाणी वास्तव्यास आहेत.सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या जिल्ह्यातील नामवंत कलाकारांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.या सोहळ्यात संतोष काशिनाथ घरत यांना देखील पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.घरत यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image