महिला दिनानिमित्त कामोठे मधून निघाली लेडीज स्पेशल यात्रा-"प्रितमदादा म्हात्रे यांनी नारळ फोडून दिल्या शुभेच्छा "

महिला दिनानिमित्त कामोठे मधून निघाली लेडीज स्पेशल यात्रा-"प्रितमदादा म्हात्रे यांनी नारळ फोडून दिल्या शुभेच्छा "



पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित साधून महिलांसाठी रविवार 13 मार्च 2022 रोजी *शेतकरी कामगार पक्ष कामोठे शहर कार्याध्यक्ष सौ.शुभांगी सुरेश खरात व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.सुरेश पांडुरंग खरात यांच्या सहकार्याने मोफत एक दिवसीय देव दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
         या सहलीला सकाळी  विरोधी पक्ष नेते .प्रितमदादा म्हात्रे यांच्या हस्ते नारळ फोडून आरंभ झाला. कामोठे ते महड गणपती दर्शन अशा प्रकारे नियोजन सौ शुभांगी सुरेश खरात यांनी केले होते.कामोठे मधील साई रचना सेक्टर 21  येथून निघून सकाळी 10 वाजता खोपोली महड अष्टविनायक गणपती दर्शन घेऊन नंतर  एस.के.आत्रा  फार्म ,मोरबे धारणा जवळ, कर्जत रोड  येथे दिवसभर च्या सहलीचे चे आयोजन केले होते. या वेळी या ठिकाणी महिलांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे नियोजन सुद्धा केले आहे. 24 तास बाराही महिने आपल्या कुटुंबासाठी वेळ देणार्‍या महिलांना एक दिवस स्वतःसाठी मिळावा या उद्देशाने आम्ही या सहलीचे फक्त महिलांसाठी नियोजन केले आहे असे त्यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला कार्यध्यक्ष शुभांगी खरात आणि व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात यांच्या मध्यामातून कामोठे ते महड गणपती दर्शन या सहलीत कामोठे मधील 400 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला.
       यावेळी  विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे यांच्यासोबत शेकाप जिल्हा चिटणीस आणि नगरसेवक श्री.गणेश कडू, मा. नगरसेवक श्री.शंकर म्हात्रे, श्री.प्रमोद भगत, शहर अध्यक्ष श्री.अमोल शितोळे, संघटक  श्री.अल्पेश माने, शिक्षक आघाडी प्रमुख श्री.दशरथ माने, युवा नेते अतुल भगत, महिला शहर अध्यक्षा उषा झणझणे उपस्थित होते.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image