डॉ.श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आ.प्रशांत ठाकूर आणि आ.महेश बालदी यांनी शुभेच्छा दिल्या
महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निरूपण व सामाजिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणारे प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी संस्थेच्या वतीने 'लिव्हिंग लिजेंड' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर रायगड भूषण निरुपणकार श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटकडून मानाची डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. त्याबद्दल तसेच रायगड भूषण आदरणीय डॉ.श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी आज (दि. ०३ मार्च ) रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.