प्रितमदादा म्हात्रे चषक २०२२ या क्रिकेट सामन्याचे आयोजन
पनवेल : शुक्रवार ४ मार्च रोजी खंडोबा ग्रुप, बोकडविरा मंडळ आयोजित प्रितमदादा म्हात्रे चषक २०२२ या क्रिकेट सामन्याचे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी शुभारंभ करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासह बोकडविरा ग्रामपंचायत सरपंच सौ.मानसी पाटील, लायन्स क्लबचे जिल्हा चेअरमन सदानंद गायकवाड, गणपती देवस्थान ट्रस्टी मनोज पाटील, ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील, उपाध्यक्ष रुपेंद्र ठाकूर, रायगड भूषण यशवंत ठाकूर, बंगळुरू बुल्सच्या संघातून खेळणारे राष्ट्रीय कबड्डीपट्टू मयूर कदम, ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील, सदस्या सौ.वंदना पाटील, शितल पाटील, निर्मला पाटील, काँग्रेस नेते जयवंत पाटील, युवानेते गिरीश पाटील, रायगड जिल्हा कबड्डी संघातील महिला कबड्डीपट्टू .श्रावणी पाटील व अन्य मान्यवर, ग्रामस्थ व खेळाडू उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी बोकडविरा गावातील कबड्डीपट्टू बंगळुरू बुल्स संघातून खेळणाऱ्या मयूर कदम याची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल त्याचे सत्कार करून अभिनंदन केले. तसेच रायगड जिल्हा महिला कबड्डी संघात निवड झालेल्या महिला कबड्डीपट्टू श्रावणी पाटील हिचे देखील सत्कार करून अभिनंदन केले.