सी के ठाकूर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय नवीन पनवेल येथे निर्मिती फॅशन शो 2022 चे आयोजन

सी के ठाकूर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय नवीन पनवेल येथे निर्मिती फॅशन शो 2022 चे आयोजन


पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः नवीन पनवेल येथील दरवर्षीप्रमाणे यंदाच्या 20 व्या वर्षी सी के ठाकूर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय बी.सी.ठाकूर सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट फॅशन डिझाईन विभागातर्फे निर्मिती फॅशन शो 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेल्या डिझाईन कलेक्शनचे प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण 9 थिम असून येथील विद्यार्थ्यांनी मोहंजोदारो, चीन, कॉकटेल, इजिप्त, हवाईयन, सकारात्मक नकारात्मक, काऊबॉय, केमोफ्लेज, निओप्लेटस आदींचा वापर केला आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मिसेस इंडिया 2022 च्या हर्षला योगेश तांबोळी व योगेश तांबोळी हे उपस्थित राहणार आहेत. तर ज्युरी सदस्य म्हणून दिव्यांगना देसाई लघाटे स्ट्रॅटेजिस्ट सामग्री लेखक, भक्ती गोरे फॅशन डिझायनर प्रोपिटर अ‍ॅल्युअर फॅशन स्टुडिओ, विभागप्रमुख वंदना देशमुख, आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थी आपल्या विविध कलागुणांना सादर करणार आहेत तसेच फॅशन शो सुद्धा होणार आहे. सदर फॅशन शो हा शुक्रवार 4 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image