सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी 1985 ग्रुपची सहल संपन्न
चिरनेर (मिलिंद खारपाटील )-सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी 1985 ग्रुपची सहल 5 आणि 6 मार्च रोजी मोठया उत्साहात संपन्न झाली.चिरनेर , भोम, कळमबुसरे, मोठी जुई येथील 27 जण या सहलीत सहभागी झाले होते
सहलीची सुरुवातीला श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ मोठी जुई यांनी हरिनामाच्या गजरात निरोप देऊन सहलीचा आनंद द्विगुणित केला.या सहलीत पाली, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, आरावी..कोंडवली बीच, दिवेआगार आदी धार्मिक आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यटन स्थळांचा या मित्रमंडळी नी मनमुराद आनंद लुटला.
या ग्रुपचे अडमीन पत्रकार मिलिंद खारपाटील यांचा 52 वा वाढदिवस महावीर चक्राने सन्मानित सुभेदार कृष्णाजी सोनावणे यांचे सुपुत्र उद्योजक रमेश सोनावणे यांच्या कुटुंबियांसोबत म्हसळा येथील सायली बार आणि रेस्टॉरंट मध्ये साजरा करण्यात आला.दिवेआगार येथील सुवर्ण गणेश मंदिरात बोर्लीपंचतन चे सरपंच गणेश पाटील यांनी या ग्रुपचे स्वागत केले.
घोंगावणारा वारा आणि समुद्राच्या लाटा येणाऱ्या कोंडवली समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या श्री समर्थ कृपा या फार्म हाऊसवर या ग्रुपमधील भजनसम्राट जयदासबुवा पंडित आणि त्यांना साथ देणाऱ्या या मित्रांच्या भजनाने आणि हरिनामाच्या गजराने कोंडवली..आरावी परिसर भक्तीरसात न्हाऊन गेला होता. गाणी, भेंड्या , समुद्रस्नान आदींचा या ग्रुपने मनमुराद आनंद लुटला.
या सहलीत मिलिंद खारपाटील, उपकार ठाकूर, राजेंद्र मुंबईकर, पद्माकर फोफेरकर, विलास हातनोलकर, विजय पाटील, प्रभाकर ठाकूर, प्रकाश फोफेरकर, रोहिदास ठाकूर, प्रकाश नारंगीकर, रवींद्र पाटील, हिरामण जीशी, संजय मोकल, जगदीश घरत, राजेंद्र म्हात्रे, विजय मुंबईकर, गजानन फोफेरकर, सुभाष पाटील, सुरेश केणी, रोहिदास पाटील, सूर्यकांत म्हात्रे, चंद्रहास म्हात्रे, जयवन्त नाईक, चंद्रकांत गोंधळी, जयदास पंडित, पद्माकर भोईर, जयवन्त भोईर असे 27 जण सहभागी झाले होते. घरी परतताना एकमेकांना साश्रू नयनांनी निरोप देऊन पुढील सहल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी चा रायगड किल्ल्याला जाण्याचे सर्वांनी ठरवले.