लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या शिक्षकांचा केला सत्कार
रयत शिक्षण शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 'कमवा आणि शिका' या योजनेतून शिक्षण घेतले. त्यावेळी मराठीचे शिक्षक म्हणून मा. के. यादव यांचे त्यांना मौल्यवान मार्गदर्शन लाभले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज सातारा येथे यादव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा. के. यादव सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कमळ यादव यांचा सत्कार केला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सोबत वसतीगृहात सहकारी राहिलेले दिनकर झिंब्रे, तसेच यादव कुटुंबीय उपस्थित होते. .