मराठी भाषा २३०० वर्षे कशी जगेल याची चिंता हवी - डॉ दीपक पवार

मराठी भाषा २३०० वर्षे कशी जगेल याची चिंता हवी - डॉ दीपक पवार

 


दादर  ता. २६ (बातमीदार) :  मराठी भाषा ही २३०० वर्षे जुनी आहे याचा मला खूप आनंद वाटत नाहीपरंतु मराठी भाषा २,३०० वर्षे कशी टिकेल याची मला खंत आहेअसे प्रतिपादन मराठी अभ्यास कक्षाचे प्रमुख प्रा. दीपक पवार यांनी केले.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई गोरेगावच्या मराठी विचारधारा प्रतिष्ठान व दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरू हॉल ट्रस्टच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन आणि ४६ वा मराठी भाषा गौरवदिन पूर्वसंध्येला ४६ वे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम धुरू हॉल सभागृहात शनिवारी झालात्याप्रसंगी ते बोलत होते. दिवाळी अंक हे आपल्याकरिता मोठे इंधन आहे. दिवाळी अंक मराठी माणसाला विचार करायला लावणारे आहेत. त्यातून होणाऱ्या सृजनाच्या आधारे मराठी संस्कृती बहरत असते.त्यामुळे दिवाळी अंकांची परंपरा ही मराठी माणसासाठी महत्वाची आहे. आपल्यासाठी  दिवाळी अंकाला जाहिरात मिळत नाही. आशय आणि मजकूर मिळत नाही. वाचकांची संख्या दिवसेंदिवस घसरत आहे. त्यामुळे त्याची गुणवत्ता घसरताना दिसत आहेतर साहित्य संमेलन घेऊन फार काही होत नाही. फक्त वातावरण निर्माण होते. मराठी माणूस इतर शहरांत फेकला जात आहेअसे पवार म्हणाले. मुंबईतील मराठीच्या दुरव्यवस्थेवर बोट ठेवत पवार म्हणालेमराठी शाळा बंद करून त्या इतर मंडळांचे अतिक्रमण लादून चकाचक केल्या जात आहेत त्यामुळे मराठी भाषेसाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. मराठी भाषा ही नदीसारखी आहे ती  शुद्ध आणि अशुद्धपणाचा सोवळेपणा असला तरी ती  आपण स्वीकारली पाहिजे. प्रवाही भाषा जपण्याची जबाबदारी जितकी सरकारची तितकीच ती आपल्या सर्वांचीच आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सरकारच्या अनास्थेमुळे मराठी संस्थांचे   काही जाचक गोष्टीमुळे कामकाज थांबले असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा शुद्ध स्वरूपात आचरणात आणली पाहिजे. इंग्रजीत शिक्षण घेणाऱ्यांमध्ये मराठी शिक्षण घेणारे आघाडीवर आहेत. मराठी भाषेचा अभिमान सर्वांना असला पाहिजे. मराठी पुस्तकेवर्तमान पत्रे विकत घेऊन वाचली पाहिजेत. मराठी चित्रपट पाहणे गरजेचे आहे. प्रकाशकलेखकमराठी वर्तमान पत्रे जगली पाहिजेतअसे मत 'मराठी माणसाची भाषिक जबाबदारीया विषयावर  तरुण भारत नागपूरचे संपादक गजानन निमदेव यांनी मांडले आहे.

मंगेश चिवटे यांनी आपल्या आयुष्यात कुसुमाग्रजांच्या कोलंबसच्या कवितेचा प्रभाव पडला त्यामुळे शेवटच्या चार ओळी मला नेहमी जगण्याला बळ देत आल्या आहेत. माणूस जगला तर भाषा जगणार आहेजगभरच्या सध्याच्या कोरोना वातावरणात शिवसेना आरोग्य कक्षाच्या माध्यमातून मला असंख्य अडचणीत असलेल्या गरिबांपर्यंत पोहोचता आले. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या अडचणी मा ना एकनाथ शिंदेसाहेब यांच्यापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्याचा मी नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन चिवटे यांनी आपल्या भाषणात दिले. 

या कार्यक्रमाला शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेशुभा कामथेजळगाव जिल्हा अर्बन बँकेचे संचालक नगरसेवक अमोल पाटीलज्येष्ठ पत्रकार रिंगणकार सचिन परब प्रमुख पाहुणे होते. कार्याध्यक्ष रमेश सांगळेकोषाध्यक्ष आत्माराम गायकवाडसंघाध्यक्ष रवींद्र मालुसरेमाजी अध्यक्ष मनोहर साळवी यांनी प्रमुख पाहुण्यांचे सांगत केलेतर या मान्यवरांच्या हस्ते या वेळी ज्येष्ठ वृत्तलेखक दत्ताराम गवसश्रीराम मांडवकर यांना जीवन गौरवतर ‘वाचन चळवळीतील स्व दत्ता कामथे सेवाभावी कार्यकर्ता पुरस्कार’ सौ अश्विनी फाटक यांना देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमात बदलत्या पर्यावरणाचा माणसाच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामाचा वेध घेणाऱ्या ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाला ‘गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक दिवाळी अंक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहेतर ‘सकाळ’च्या दिवाळी अंकासह तरुण भारत (नागपूर)  अंकाला मनोरंजनकर का. र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक,  प्रसाद (पुणे)ऋतुरंग (मुंबई)चिकू पीक (पुणे)आनंद तरंग (पुणे)पुढारी दीपस्तंभ (कोल्हापूर)ऋतुपर्ण (पुणे) या दिवाळी अंकांनाही पुरस्कार देण्यात आला आहे. काही अंकांना उत्कृष्ट व उल्लेखनीय अंक म्हणून गौरविण्यात आले.

संघाच्या वतीने मराठी माणसाची भाषिक जबाबदारी या विषयावरील लेख स्पर्धेतील अवंतिका महाडिक (प्रथम क्रमांक)अर्जुन जाधव (द्वितीय क्रमांक),

दीपक गुंडये (तृतीय क्रमांक) यांनी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मराठी भाषेला तातडीने अभिजात मराठी भाषेचा दर्जा द्यावा यासाठी उपस्थितांच्या सह्या घेऊन तो ठराव देशाचे राष्ट्रपतीपंतप्रधान आणि सांस्कृतिक  मंत्री यांना एकमताने ठरले.

प्रमुख कार्यवाहक प्रशांत घाडीगावकरप्रशांत भाटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेतर आभार अरुण खटावकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाडदिगंबर चव्हाणसुनील कुवरेअनंत आंगचेकरचंद्रकांत पाटणकरराजेंद्र लकेश्रीमनोहर साळवीविजय ना कदमनारायण परब  यांनी विशेष मेहनत घेतली.