मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

 मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा.




उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ह्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत मनसेच्या वतीने उरण तालुक्यातील कोप्रोली येथे मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आले तसेच ज्या दुकानदारानी मराठीत फलक लावले होते त्यांना पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले . मनसे मराठी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी हे सुंदर उपक्रम राबविले . ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित विधानसभा अध्यक्ष विजय तांडेल , राकेश भोईर , विभाग प्रमुख दिपक पाटील, सोनारी ग्रामपंचायत सदस्य अंकुश तांडेल ,बबन ठाकूर , सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील आणि आजी माजी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, उरण परिसरातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी मनसेचे उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांचे आभार मानून असे उपक्रम मनसेच्या माध्यमातून प्रथमच झाला असल्याचे सांगत नागरिकांनी या उपक्रमांचे कौतुक केले . ह्या कार्यक्रम प्रसंगी सर्व शाखा अध्यक्ष उपस्थित होते .