जम्मूतील वैष्णोदेवीस कामोठेकरांचे साकडे;"नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव लागो"
पनवेल (प्रतिनिधी )
लोकनेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला लागू दे असे वैष्णोदेवी मातेस कामोठेकरांनी परिवारांसह साकडे घातले.
श्रद्धा आणि आस्था याचे आज दर्शन जम्मू मधील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात पहायला मिळाले.दीडशे कामोठेकरांनी आज जम्मूतील कटरा येथील वैष्णोदेवी मातेचे परिवारासह दर्शन घेतले. सर्वांनी मातेस नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव लागो असे साकडे घातले.
माते तुझ्या दारी आलो,
मागणे मागाया..
पाटी विमानतळाला,
दिबांची लागाया..
असा बॅनर झळकावीत उपस्थितानी दिबांच्या नावाचा जयघोष करीत जय माता दि च्या घोषणानी आसमंत दणाणून सोडला. मीरा भायंदर तसेच मुंबई मधून आलेल्या भक्तांनीही यावेळी सहभाग घेतला. काही परप्रांतीय भक्तांनी यावेळी याविषयीची माहिती करून दिबांची महती जाणून घेतली.