पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
पनवेल / प्रतिनिधी :- पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्था नवीन पनवेल ची स्थापना 1 जानेवारी 2021 रोजी केले होती यासंस्थेचा आज प्रथम वर्धापन दिन पंचशील बुद्ध विहाराच्या प्रगणात पंचशील नगर नवीनच्या येथे सायंकाळी 7 वाजता सुरू करण्यात आला.
यावेळी महापुरुषांना वंदन करून तसेच भीमा कोरेगावच्या पराक्रमी शुराना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेने केलेल्या कामाचा आढवा घेण्यात आला असून संस्थेने अध्यक्ष शंकर मारुती वायदंडे यांनी संस्थेला वेळोवेळी सहकार्य मदत करणाऱ्या कमिटी पदाधिकारी सदस्य नागरिक तसेच हितचिंतक या सर्वाचे आभार मांडले.
या वेळी संस्थेची वर्षभरातील कामे लॉकडाऊन मधील पंचशील नगर सेनीटायझ करणे मोफत गरीब गरजूलाअन्नदान,पोलीस बांधवाना चहा पाणी वाट,गरिबांना कपडे वाटप ,डॉ.बाबासाहेब जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती अण्णाभाऊ साठे जयंती लहुजी साळवे जयंती, स्वतंत्र दिन, ईद निमित्त अन्नदान शिरखुरमा वाटप पंचशील बुध्द विहाराला लादी बसवणे, rte मधून मुलांचे ऍडमिशन फॉर्म भरून मतदान नोंदणी आवाहन आरोग्य कार्ड वाटप असे अनेक सामाजिक कामे बेनर लावून वाचन करण्यात आले
संस्थेच्या कमिटीचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मुलांना कलेला वाव देण्यासाठी गायन स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व मुलांना प्रशस्तीपत्रक व पहिल्या चार स्पर्धकाला सन्मानचिन्ह देणून गौरविण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर सर्वाचा संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे सचिव राहुल पोपलवार,सहसचिव विनोद खंडागळे,संघटक कैलास नेमाडे, सहसंघटक संतोष जाधव सह खजिनदार अजय दुबे सदस्य संतोष ढोबळे विनोद तायडे, अमेय इंगोले हेमा रोड्रिंक्स आदी सह रहिवाशी सुनील वानखेडे सीताराम पोपलवार आदी अनेक रहिवाशी नागरिक महिला उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमन तायडे उमेश पलमाटे, रवी पोपलवार लुहू लंके अनेज मुलांचे सहकार्य लाभले