खारघर शहरा मधील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश-शाखाप्रमुख व उप शाखाप्रमुखांना नियुक्ती पत्र प्रदान

खारघर शहरा मधील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश-शाखाप्रमुख व उप शाखाप्रमुखांना नियुक्ती पत्र प्रदान



खारघर(प्रतिनिधी)- काल दिनांक 19 जानेवारी २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननिय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवसेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन व राज्यशिष्टाचार मंत्री (महाराष्ट्र राज्य) सन्माननिय आदित्य ठाकरे साहेब आणि उदयोग मंत्री सुभाष देसाई साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.शिरीष घरत  यांच्या नेतृत्वाखाली तसेच खारघर शहरा मधील शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. व नवनिर्वाचित शाखाप्रमुख व उप शाखाप्रमुख यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

      त्याप्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्री. शिरीष दादा घरत, शिवसेना पनवेल महानगर समन्वयक श्री. गुरुनाथ दादा पाटील, उप महानगर प्रमुख दीपक घरत, खारघर शहर प्रमुख श्री. प्रकाश गायकवाड, विभाग प्रमुख संजय सावंत,राजेश बेर्डे उत्तम मोरबेकर,संघटक देवरे साहेब, उप विभा प्रमुख संतोष गुजर, बंडू कोळी,उप शहर प्रमुख वैभव दळवी,प्रशांत जांभुळकर सर्व उप विभाग प्रमुख शाखाप्रमुख आणि उप शाखा प्रमुख व शिवसैनिक आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 नवनियुक्त पदाधिकारी-  

शाखा प्रमुख सेक्टर -15-प्रदीप बळीराम जाधव                    शाखाप्रमुख सेक्टर -40नरेश रमेश राठोड                            शाखाप्रमुख सेक्टर -12-संतोष मनोहर शिंदे                                  शाखा प्रमुख सेक्टर -11-विशाल विश्राम कावडे                        उप शाखा प्रमुख खारघर गाव-मिथुन भरत पलसमकर                उप शाखा प्रमुख सेक्टर -10-सोनू राजेश बोटे

 

Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image