पनवेलमध्ये बुधवारी सर्वात मोठ्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

पनवेलमध्ये बुधवारी सर्वात मोठ्या राज्यस्तरीय  रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ



पनवेल(प्रतिनिधी) शैक्षणिक,सामाजिक,वैद्यकीय, कलाक्रीडासांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १८१९ आणि २० व्या राज्यस्तरीय  रायगड जिल्हास्तरीय या सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दिनांक ०५ जानेवारी रोजी सायंकाळी ०४ वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे. 
              या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी व साहित्यिक रामदास फुटाणे, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय महासंचालक दिलीप पांढरपट्टे, ललित मासिकाचे स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याचा साहित्य प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, संयोजक दीपक म्हात्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विष्णू सोनावणे यांनी केले आहे.
                                              -----असे आहे बक्षिसांचे स्वरूप- 
 राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस ७५ हजार रुपये, व्दितीय क्रमाकांस ३५ हजार तर तॄतीय क्रमाकांस २० हजार रूपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कॄष्ट कथेसाठी ०७ हजार रूपये, उत्कॄष्ट कविता व उत्कॄष्ट व्यंगचित्रास प्रत्येकी २५०० रूपये, उत्कृष्ट विशेषांकास ०५ हजार रुपये, उत्कृष्ठ मुखपृष्ठ ०५ हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सवोत्कॄष्ट अंकास ७५०० रूपये.  रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ३० हजार रूपये, व्दितीय क्रमांकास १५ हजार रूपये आणि तॄतीय क्रमाकांस ७५०० रूपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ०३ हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे. 
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image