*नशा मुक्त नवी मुंबई* ’ या अभियानाचे अनुशंगाने अंमली पदार्थ खरेदी विक्री व व्यसन करणार्‍या इसमांवर कारवाई

*नशा मुक्त नवी मुंबई* ’ या अभियानाचे अनुशंगाने अंमली पदार्थ खरेदी विक्री व व्यसन करणार्‍या इसमांवर कारवाई


बिपीन कुमार सिंह मा.पोलीस आयुक्त साो, श्री महेश घुर्ये मा. अपर पोलीस आयुक्त साो. (गुन्हे) यांनी ‘‘ *नशा मुक्त नवी मुंबई* ’ या अभियानाचे अनुशंगाने अंमली पदार्थ खरेदी विक्री व व्यसन करणार्‍या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे श्री सुरेश मेंगडे, मा. पोलीस उप आयुक्त साो., गुन्हे व श्री विनायक वस्त, मा. सहा. पोलीस आयुक्त साो., गुन्हे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून ड्रग्ज माफियांचा शोध घेण्यात येत होता. 

दि. 30/12/2021 रोजी कक्ष 3, गुन्हे शाखेकडील अंमलदार नामे पोना/2643 संजय फुलक यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कक्ष 3 गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी कक्ष व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्तरित्या कारवाई करुन 31 डिसेंबरच्या पाटर्यांसाठी तरुणांना विकण्यासाठी ड्रग्ज आणणारा इसम नामे कलीम रफिक खामकर* वय 39 वर्षे रा. पनवेल,  यास ‘‘एम डी ‘‘ या अंमली पदार्थासह नेरे येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केलल्या तपासातून पुढे त्याचे सहकारी जकी अफरोज पिट्टु* वय 33 वर्षे, रा. पनवेल व सुभाष रघुपती पाटील वय 40 वर्षे रा व ता. पेण, जि. रायगड यांना सदर गुन्हयात ताब्यात घेवून नमुद इसमांकडून *एकूण 2,50,00,000/- किंमतीचे 2 किलो 500 ग्रॅम ‘‘एम डी ड्रग्ज’’ हा अंमली पदार्थ जप्त केला. या तप* नमुद आरोपीविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यांना सदर गुन्हयात दिनांक 31/12/2021 रोजी अटक करण्यात आलेली आहे.प्रथमच एम डी ड्रग्ज’’ त!आर करण्याचा कारखाना शोधण्यात यश आले असुन तो सिल करण्यात आला आहे गुन्हयाचा तपास सुरु आहे.

 *सदर इसमांकडून खालील मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेला आहे.* 

1) 2.50,00,000/-(2.5 कोटी) पांढ-या क्रीम रंगाची एकुण 2 किलो 500 ग्रॅम वजनाची ‘‘मेथ्यॉक्युलॉन पावडर (एम डी)’’ हा अंमली पदार्थ. 

2)3,50,000/- एक पांढ-या रंगाची मारुती स्विफ्ट कार नंबर एम एच 46 पी 8426  

3) 20,000/- एक काळया रंगाचा ॲपल कंपनीचा मोबाईल 

4) 900/- रू रोख रक्कम. त्यात 500/-रू दराची एक नोट व 100/- रु. दराच्या 04 नोटा भारतीय चलनाच्या . 

5) 00/- निळया रंगाची प्लॅस्टिकची पिशवी (’’मेथ्यॉक्युलॉन पावडर’’ ठेवण्याकरिता वापरलेली)

 *रु- 2,53,70,900/- एकुण किंमत* 

अटक आरोपीचे नाव व पत्ता - 

1) कलीम रफिक खामकर वय 39 वर्षे रा. पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड 

2) जकी अफरोज पिट्टु वय 33 वर्षे, रा. आपटा, ता. पनवेल, जि. रायगड

3) सुभाष रघुपती पाटील वय 40 वर्षे रा व ता. पेण, जि. रायगड       

आरोपींवर दाखल गुन्हयांची माहिती.


1) *पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. 371/2021 एनडीपीएस कायदा 1985 चे कलम   8(क), 22(क)* 

      सदर कामगिरीकरीता कक्ष-03, गुन्हे शाखेचे वपोनिरी शत्रुघ्न माळी, सपोनि सागर पवार, पोहवा/974 मोरे, पोहवा/889 कोळी, पोना/1806 पाटील, पोना/2016 पाटील, पोना/2091 जेजूरकर, पोना/2643 फुलकर, पोना/2225 बोरसे, पोना/603 सोनवलकर, तसेच एएचटीयु चे वपोनि श्री. पराग सोनावणे, तसेच अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वपोनि श्री. बी एस सय्यद, पोउपनिरी विजय शिंगे, सपोउपनिरी इनामदार, पोहवा/1301 उटगीकर, पोहवा/1202 पिरजादे, पोहवा/1254 कांबळे यांनी महत्वपुर्ण कामगीरी बजावलेली आहे.