विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात, 23 हजार 250 रुपयांचा दंड वसूल

विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात, 23 हजार 250 रुपयांचा दंड वसूल


पनवेल : राज्यभर ओमायक्राॅन विषाणूंचे रुग्ण वाढत आहेततसेच पनवेल तालुक्यात देखील काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयामार्फत विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.

              पनवेल तालुक्यातील विवाह सोहळे, रेस्टोरांट, शॉपिंग माॅल्सगर्दीची ठिकाणे, सार्वजनिक स्थळे, दुकाने येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांना ५०० रूपये दंड आकारण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील होटेल्सफार्म हाउस, शेतघर यामध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. रात्रीची जमावबंदी पालिकेने घोषित करण्यात आलेली असल्याने रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊ नयेत अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. पनवेल तालुक्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांकडून 23 हजार 250 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 

चौकट

कोरानाच्या ओमायक्राॅन विषाणूच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून नागरिकांनी कोरानाच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.  विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल