कोकण भवन येथे लेखा व कोषागारे दिन साजरा

                                                                                              *कोकण भवन येथे लेखा व कोषागारे दिन साजरा*


नवी मुंबई दि.01 :- कोकण भवन येथील सहसंचालक लेखा व कोषागारे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 1 फेब्रुवारी  हा लेखा व कोषागार दिन आज उत्साहात साजरा केला. 

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर लगेचच शासनाचा जमा व खर्च  लेखा परिक्षण, त्याचे लेखांकन व संकलन या कामासाठी एका विशेष अशा विभागाची स्थापना करणे आवश्यक वाटले. म्हणून राज्य शासनांने 1 जानेवारी 1962 रोजी लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना केली. या प्रकारचे काम करताना या संचालनालयाला तज्ञ अशा विशिष्ट सेवेची आवश्यकता भासू लागली. ही गरज पूर्ण करण्यासाठी तसेच राजपत्रित, अराजपत्रित, सर्व कर्मचारी यांचे आस्थापना विषयक सर्व बाबींसाठी शासनाने 01 फेब्रुवारी 1965 पासून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा स्थापना केली व तेव्हापासून 1 फेब्रुवारी हा दिवस  ' कोषागार दिन ' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांची वेतने व इतर देयके लेखा व कोषागारे या कार्यालयामार्फत अदा केली जातात. तसेच शासनाच्या कार्यालयांची लेखा परिक्षणाचे महत्त्वाचे कार्य देखील या कार्यालयामार्फत केले जाते. संचालक लेखा व कोषागारे हे विभाग प्रमुख आहेत. संचालनालयाचे मुख्यालय मुंबई असून पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपुर व कोकण भवन येथे प्रत्येकी एक या प्रमाणे सहा प्रादेशिक कार्यालये आहेत. 

या कार्यक्रमास प्रभारी सहसंचालक श्री.राजेश भोईर, सहाय्यक संचालक श्रीम.रजनी केळकर, लेखाधिकारी (वेतन पडताळणी) श्री.रविंद्र दातार, लेखाधिकारी (भांडार पडताळणी) श्री.कृष्णकांत ठाकूर, लेखाधिकारी (संगणक) श्री.रविंद्र शेडगे तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.