निर्मला फाउंडेशनच्या वतीने एस.एस.सी गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक सत्कार संपन्न

निर्मला फाउंडेशनच्या वतीने एस.एस.सी गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक सत्कार संपन्न



पनवेल/प्रतिनिधी,दि.१९-शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती करून आपले आयुष्य यशस्वी करावे आणि सामाजिक बांधिलकी या उद्देशाने निर्मला फाउंडेशन गुळसुंदे यांच्या वतीने रसायनी परिसरातील गुळसुंदे हायस्कूल, आपटे विद्यालय, सावळे विद्यालय, चावणे विद्यालय , वाशिवली विद्यालय, जनता विद्यालय मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमिक विद्यालय, रिलायन्स फाउंडेशन स्कूल या  शाळांतील एस.एस.सी परीक्षा २०२५ मधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त २९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री. मोहन कोंगेरे साहेब, Idemitsu कंपनीचे डेप्युटी मॅनेजर श्री. गोपाळ सुरवसे साहेब, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. देवा पाटील , मुख्याध्यापक झिंगे सर ,राहुल चिपळेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. निर्मला फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल पाटील सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू सांगितला तसेच विद्यार्थ्यांना कौतुकाची शाब्बासकी दिल्याने विद्यार्थी अधिक जोमाने प्रगती करून आपल्या पुढील आयुष्यात यशस्वी होतील हा विश्वास मांडला.   उत्तम शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन कसे घेतले पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गोपाळ सुरवसे  यांनी शिक्षण घेत असताना कितीही कठीण प्रसंग आले तरी आपण आपले ध्येय कसे पूर्ण करावे यावर मार्गदर्शन केले. रयतच्या रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री.मोहन कोंगेरे  यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये यशस्वी होत असताना आई वडिलांना विसरू नका हा संदेश दिला. या कार्यक्रम प्रसंगी छावण्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पद्माकर झिंगे , राजे प शाळा खेडूपाडा येथील उपशिक्षक श्री.  कैलास रायकर, तुंगार तर विभाग विद्यामंदिर गोसुंदे येथील उपशिक्षिका श्रीमती मुल्ला के.एफ. , रा. जि.प.शाळा कासप येथील उपशिक्षिका सौर रूपाली काळे यांना निर्मला फाउंडेशन तर्फे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चावणे विद्यालयाचे मुख्याध्यापक  पद्माकर झिंगे सर यांनी निर्मला  फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार निर्मला फाउंडेशनचे सचिव प्रशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन सौ रुपाली पाटील ,सृष्टी पाटील यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. विकास पाटील, रुबेन पाटील, रूपम पाटील,कल्पना पाटील, प्रियंका पाटील, वृषाली ठोंबरे यांनी सहकार्य केले.