महेंद्रशेठ घरत चषक' आणि 'करंजाडे प्रीमियर लिग'चे महेंद्रशेठ यांच्या हस्ते झोकात उदघाटन
करंजाडे मैदानासाठी राजकीय चपला बाजूला ठेवा : महेंद्रशेठ घरत
उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )"करंजाडे गावावर माझे विशेष प्रेम आहे. मी जिल्हा परिषद सदस्य असताना करंजाडे गावाला जलकुंभ बांधला होता. महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यावेळी केले होते. आता करंजाडे गावाला मैदान हे मिळालेच पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी राजकीय चपला बाहेर ठेवाव्यात. मैदानासाठी आमदारांचे पत्र आणा, आपण पाठपुरावा करून करंजाडेसाठी अधिकृत मैदान मिळवू," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत करंजाडे येथे म्हणाले. त्यांच्या हस्ते करंजाडे प्रीमियर लिगचे आणि पारगाव येथे बॅड बाईज ग्रुपने आयोजित केलेल्या 'महेंद्रशेठ घरत चषका'चे उदघाटन शनिवारी (ता. २४) झाले. यावेळी करंजाडे सरपंच मंगेश शेलार, रामेश्वर आंग्रे, विनोद साबळे, मारुती गायकर, सुनील भोईर, मारुती पोपट, बळीराम भोईर, सनी कैकाडी, योगेंद्र कैकाडी, अजय साबळे, संतोष विखारे, अनिल भोईर, विजय आंग्रे, योगेश राणे, तानाजी शेलार, मेघदूत कैकाडी, हेमंत गायकर आदी उपस्थित होते.
पारगाव येथे महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मी क्रिकेटचा चाहता आहेच; परंतु माझ्या नावाने क्रिकेट स्पर्धा भरवून पारगावच्या तरुणांनी मला एक वेगळीच एनर्जी दिली आहे. त्याबद्दल बॅड बॉईज ग्रुपचे अभिनंदन. त्यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे, चांगल्या प्रकारची बक्षिसे आहेत. काँक्रिटच्या जंगलात मैदान हवेच आणि गावांची ओळखही जपायला हवी, यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा. मी खंबीरपणे त्यांच्या मागे आहे."
यावेळी माजी सरपंच विश्वनाथ पाटील, सुशीलकांत तारेकर, शेखर देशमुख, उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, अलंकार परदेशी, वैभव पाटील, तसेच एम. जी. ग्रुपचे सहकारी आणि परिसरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितेश पंडित यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

