माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने नगरसेविका सौ स्नेहल पाटील ढमाले यांची प्रभाग 18 मध्ये कामाला सुरुवात
लोखंडी पाडा इथे नवीन पाईप लाइन टाकण्याच्या कामाची पाहणी करीत असता तेथील नागरिकांनी त्यांची आणखीन एक समस्या सांगितली. स्वा.सावरकर चौक लगत असलेल्या वडाळे तलावाच्या बाजूला एक छोटेसे पटांगण असून बाजूलाच अंगणवाडी आहे. तेथील मोकळ्या जगात लहान लहान झाडे झुडपे उगवली होती तसेच बाजूच्या कंपाऊंड लगत पाणी साचले होते त्यामुळे दुर्गंधी आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला होता. नागरिकांच्या या तक्रारीवर लगेच लक्ष घालत महापालिका सफाई विभागाशी फोन वर संपर्क साधून त्वरित जागेची साफ सफाई करून घेतली.आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत नगरसेविका सौ स्नेहल पाटील ढमाले यांनी नागरिकांची समस्या त्वरित सोडविली यासाठी नागरिकांनी त्यांचे आभार मानले.


