पनवेल महापालिकेचे मतदान जागरूकतेच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन
पनवेल,दि.21 : महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा याकरिता जनजागृती करण्यासाठी आज दिनांक 22 डिसेंबर रोजी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार केएलई महाविद्यालय कळंबोली येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार मतदान जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने स्वीप (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम) कार्यक्रमचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यामध्ये केएलई महाविद्यालय कळंबोली येथे आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच घोषवाक्य (स्लोगन) स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
महापालिका कार्यक्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी महापालिकेच्यावतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत प्रभात फेरी, मॅरेथॉन्, फ्लॅश मॉब, मास्कॉट्स, सेल्फी पाँईटस,आईसी व्हॅन, जनजागृती केली जात आहे.

