सार्थ लोकनिती वृत्तपत्राचे संपादक संतोष वाव्हळ यांचे तिर्थरूप कै. भाऊसाहेब वाव्हळ यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न

सार्थ लोकनिती वृत्तपत्राचे संपादक संतोष वाव्हळ यांचे तिर्थरूप कै. भाऊसाहेब वाव्हळ यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न


पुणे -  सार्थ लोकनिती वृत्तपत्राचे संपादक संतोष वाव्हळ यांचे वडील कै. भाऊसाहेब सावळेराम वाव्हळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ५ डिसेंबर २०२५ रोजी ढोबळेवाडी जारकरवाडी येथे संपन्न झाला . हा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या सहभागात पार पडला . कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता प्रतिमापूजनाने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९.०० ते ११.०० वाजता ह.भ.प. प्रतिक्षाताई जाधव महाराज (शिडी) यांच्या हरिकीर्तनाने झाले . या कीर्तनात ज्ञानदिप वारकरी शिक्षण संस्थेचा सहभाग होता त्यामुळे मुळे भक्तांसाठी आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.या कार्यक्रमांतून उपस्थितांना भक्तीभावनेचा अनुभव घेतला. पुण्यस्मरणात संपूर्ण वाव्हळ परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक आणि ढोबळेवाडी-जारकरवाडीतील ग्रामस्थ पुण्यस्मरणात उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. 

            या कार्यक्रमात. कै. भाऊसाहेब सावळेराम वाव्हळ यांना आदरांजली देण्यासाठी पुणे जिल्हा माजी उपाध्यक्ष अरूणभाऊ गिरे,माजी सभापती रामचंद्र ढोबळे,सेवा निवृत्त कृषि विस्तार अधिकारी दत्तात्रय भोजने,अहिल्यादेवी धर्मशाला अध्यक्ष जयवंतराव कवितके , सचिव नवनाथ जारकड़,PSI जीवराज वाघमारे, जलिंदर भोजने, पुणे जिल्हा महिलाराष्ट्रवादी उपाध्यक्ष रुपाली भोजने , बजरंग देवड़े, हनुमंत तागड़,पंथरीनाथ काकडे ,बाबुराव ढोबळे तसेच सामाजिक,राजकीय,शैक्षणिक शैत्रातील आदी मान्यवर उपस्थित राहिले.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image