अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
नवीन वर्ष कॅलेंडर अनावरण आणि 'घरपोच' वितरण!
नवी मुंबई/प्रतिनिधी,दि.८-श्री.अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले.
यावेळी मा.उपमहापौर अशोकराव गावडे मा.नगरसेविका निर्मलाताई गावडे मा.नगरसेविका स्वप्नाताई गावडे मंडळाचे प्रमुख सल्लागार संदीप बोटे मंडळाचे अध्यक्ष सर्व सभासद सोसायटीमधील ज्येष्ठ सभासद माता-भगिनींच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडला.यावेळी सन्माननीय माजी उपमहापौर श्री.अशोक गावडे यांनी उपस्थितांना येणारे नवीन सुख-समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
