संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
पनवेल : सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी, पनवेल यांच्या वतीने नव्याने सजविण्यात आलेल्या मराठा भवन कार्यालयाचे उद्घाटन रविवार, दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन सोबतच मराठा कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मनोज दादांच्या मुंबईतील दोन्ही आंदोलनांदरम्यान महाराष्ट्रभरातून आलेल्या मराठा बांधवांची सेवा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सेवाभावी संस्था, स्वयंसेवक व मराठा बांधवांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन करताना मराठा समाजाने एकदिलाने संघटित राहून न्यायाच्या लढ्यात कायम उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे.आपल्याला मिळणाऱ्या अधिकारांसाठी संघर्ष थांबणार नाही, तो शेवटपर्यंत सुरूच राहील.शिक्षण, रोजगार, व सामाजिक एकजूट हीच खरी ताकद आहे. मराठा समाजातील प्रत्येक तरुणाने स्वतःवर विश्वास ठेवून पुढे यायला हवे.
या कार्यक्रमामध्ये सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीच्या वतीने मनोज दादा जरांगे पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. समाजातील अनेक मान्यवर मराठा समाज बांधव,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी चे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सदानंद शिर्के, रायगड जिल्हा समन्व्यक विनोद साबळे, गणेश कडू, रामदास शेवाळे, संस्थेचे इतर पदाधिकारी, सदस्य व प्रत्येक विभागातील सर्व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
