पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती

पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती*





*शहरातील 5 उद्यानांध्ये सोलार ट्रींची उभारणी पूर्ण*


पनवेल, दि.10 : पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळाल्यानंतर प्राप्त झालेल्या बक्षीस रक्कमेतून शहरातील विविध प्रभागांमधील पाच उद्यानांमध्ये नाविन्यपुर्ण अशा ‘सोलार ट्री’ उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली  राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून, ऊर्जा बचत, स्वच्छ ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरण जनजागृती यांना मोठा हातभार लागणार आहे. 

डीपीआर मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या कामाअंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खालील 5 ठिकाणी सौर-ट्रींची स्थापना करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळणार असून, नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक संदेशही पोहोचणार आहे. पुढील काळात अशाच आणखी पर्यावरणपूरक प्रकल्पांना गती देण्याचा मानस उपायुक्त स्वरुप खारगे यांनी व्यक्त केला आहे.


चौकट


*स्थापित सोलार ट्रींची ठिकाणे :*

1. ‘अ’ प्रभाग – खारघर सेक्टर 20 प्लॉट 21

2. नावडे उपविभाग (तळोजा) सेक्टर 14 प्लॉट 92

3. 3. ‘ब’ प्रभाग – कळंबोली सेक्टर 6E प्लॉट 2

4. 4. ‘क’ प्रभाग – कामोठे सेक्टर 5 प्लॉट 45

5. ‘ड’ प्रभाग – पनवेल  नवीन पनवेल सेक्टर 16 प्लॉट 3


चौकट


*पर्यावरण विभागाची चमकदार कामगिरी*


पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पनवेल महानगरपालिकेने प्रभावी पावले उचलली आहेत. यामध्ये धूळ नियंत्रण, हवेची गुणवत्ता तपासणी आणि शुद्धीकरणासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करून शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ हवा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

यामध्ये 4 फॉग कॅनन वाहने, याशिवाय, एअर मॉनिटरिंग व्हॅन च्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील हवेची गुणवत्ता (Air Quality Index - AQI) नियमितपणे मोजली जाते. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी 5 एअर प्युरिफिकेशन सिस्टीम्स बसविण्यात आलेल्या असून लवकरच अजून 5 ठिकाणी या सिस्टीम बसविण्यात येणार आहे.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image