"जाणीव" सामाजिक संस्थेच्या दिनदर्शिकेचे आ.प्रशांत ठाकूर आणि भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या शुभहस्ते प्रकाशन
पनवेल/प्रतिनिधी दि.७- जाणीव एक सामाजिक संस्था, संस्थापक -अध्यक्ष नितीन जयराम पाटील यांच्या वतीने दरवर्षी लोकोपयोगी,सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा,सांस्कृतिक,वैद्यकीय शिबीर,असे अनेक उपक्रम राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिका प्रभागात वाटप होणार आहे. त्याचे प्रकाशन सोहळा कार्यक्रम पनवेल विधानसभा संवेदनशील आमदार श्री. प्रशांत ठाकूर साहेब व भाजप जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.या प्रसंगी जाणीव एक सामाजिक संस्था, सखी महिला मंडळ , अभिनव युवक मित्र मंडळ, श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, नादस्फूर्ती ढोल ताशा पथक सामाजिक संस्था,अभिनव स्वरगर्जना ढोल ताशा पथक , या सर्व संस्था व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भाजप प्रभाग क्रमांक १८ मधिल पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
