थ्रो-बॉल स्पर्धेतील विजेत्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन

थ्रो-बॉल स्पर्धेतील विजेत्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन 



पनवेल (प्रतिनिधी) गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘गुरुकुल ऑलिम्पिक्स २०२५–२६’ या थ्रो-बॉल स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आला. 

क्रीडा शिक्षक संग्राम फोफेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले. या यशाबद्दल विद्यार्थी संघाचे स्कूल मॅनेजमेंट कमिटीतर्फे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, आरटीपीएस खारघरच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, सीबीएसईचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, रायगड विभागीय पीआरओ बाळासाहेब कारंडे, ऍड. राहुल घरत, तसेच शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image