गणपत वारगडा प्रस्तुत २०२६ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न..

गणपत वारगडा प्रस्तुत २०२६ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न..


पनवेल/ प्रतिनिधी :

आदिवासी समाजाचे क्रांतिकारक, सण व समाजातील इतर माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून आदिवासीच्या घरा घरात पोहचण्यासाठी आणि समाज प्रबोधन होण्याच्या उद्देशाने आदिवासी संघटनेचे अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा हे गेल्या १४ वर्षांपासून आदिवासी दिनदर्शिका काढत असतात.

      दर वर्षाप्रमाणे २०२६ या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवार (दि. ३० डिसें. २५) रोजी राहत्या घरी प्रकाशन करण्यात आले. गणपत वारगडा हे आदिवासी सम्राट नावाचे वृत्तपत्र अनेक वर्षांपासून चालवत आहेत, त्याबरोबर आदिवासी दिनदर्शिका काढून समाजापर्यंत पोहचवत असतात. त्यामुळे त्यांना समाजाची जाणीव आहे, असे दिनदर्शिकेच्या प्रकाशनावेळी मा. खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

      यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, जेष्ठ पत्रकार गणेश कोळी, जेष्ठ पत्रकार संजय कदम, बाळू जुमलेदार, लोकमतचे पत्रकार मयूर तांबडे, वेध विकासाचा संपादक सुनील पाटील, आपले रायगडचे संपादक सुनील वारगडा, मालडुंगे ग्रामपंचायात सदस्य व गायिका उषा वारगडा, पत्रकार रवी गायकवाड, अनिल कुरघोडे, सानिप कलोते, दीपाली पारस्कर आदी. उपस्थिती होते.