खारघरमधील सचिन तेंडुलकर मैदानावर सुरक्षारक्षक तैनात-माजी नगरसेविका सौ.नेत्रा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
खारघर/प्रतिनिधी,दि.८-माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सेक्टर 21 मधील रहिवाशांच्या मागणीनुसार माननीय आयुक्त महोदय पनवेल महानगरपालिका यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर काल रात्रीपासून खारघर सेक्टर 21 सचिन तेंडुलकर मैदान या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत.
या मैदानावर रात्री-अपरात्री दुरवरून तरूण-तरूणी येत असतात.झाडाझुडपात त्याच्या चालणाऱ्या चाळयांना पायबंद बसावा आणि दारू पार्ट्यांना लगाम लागावा आणि प्रामाणिक करदात्यांना सुरक्षितता लाभावी या हेतूने सन्माननीय आयुक्त साहेबांनकडे ही मागणी करण्यात आल्याचे सौ.नेत्रा पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

