विज्ञान प्रदर्शनात जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या हिमांशू पाटील शाळेने पटकावली चॅम्पियन्स ट्रॉफी
पनवेल : शिक्षण विभाग पंचायत समिती, खालापूर व तालुका गणित–विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुका विज्ञान प्रदर्शन, खालापूर (२०२५–२६) “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM” या संकल्पनेअंतर्गत १८ व १९ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या प्रदर्शनात जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, पनवेल संचलित हिमांशु दिलीप पाटील इंग्रजी माध्यम शाळा, खालापूर यांनी गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे विज्ञान प्रदर्शनामधील चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली.
संदिप कराड, गटविकास अधिकारी पं. स. खालापूर, दीपा परब-गवस, गटशिक्षणाधिकारी पं. स. खालापूर, शिल्पा पवार-दास वरिष्ठ विस्तार अधिकारी पं.स.खालापूर, जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या ममता प्रितम म्हात्रे व सुनीता दिलीप पाटील या प्रमुख मान्यवर म्हणून बक्षीस समारंभासाठी उपस्थित होत्या. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष म्हणून या यशाचा अभिमान असल्याचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी म्हटले आहे.

