मुंबईचा मंत्रा क्रिकेट क्लब ‘रामशेठ ठाकूर कप’ अंडर १६ स्पर्धेचा विजेता

 मुंबईचा मंत्रा क्रिकेट क्लब ‘रामशेठ ठाकूर कप’ अंडर १६ स्पर्धेचा विजेता


दिलीप वेंगसरकर यांचे प्रभावी मार्गदर्शन; १२ संघांच्या सहभागाने स्पर्धेला मोठा प्रतिसाद

पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर आयोजित पहिल्या “रामशेठ ठाकूर कप” अंडर १६ क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यंत रोमांचक झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या मंत्रा क्रिकेट क्लबने एमसीसी ठाणे संघावर मात करत स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले.

         स्पर्धेदरम्यान उपस्थित राहून युवा खेळाड्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर म्हणाले कि,  दीर्घ खेळी करायला शिका, शिस्त, निष्ठा आणि निर्धार तुम्हाला यशाकडे नेतील त्यामुळे ही तीन गुणवैशिष्ट्ये तुम्हाला खेळात अधिक उंचीवर घेऊन जातील. क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी संयम, सातत्य आणि सरावाला पर्याय नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

         वेंगसरकर यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन आणि सुरळीत आयोजनाबद्दल प्रशिक्षक अमित जाधव, किरण ठाकूर, पुंडलिक पोटेकर, संदीप पवार आणि कृष्णा बालू यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. तसेच सुंदर, खेळास पोषक अशा विकेट्सची निर्मिती केल्याबद्दल ग्राउंड्समनचेही त्यांनी अभिनंदन केले.या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला होता. युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, स्पर्धात्मक वातावरणात गुणांची कसोटी व्हावी आणि स्थानिक पातळीवर दर्जेदार क्रिकेट पुढे यावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.स्पर्धेत गटसाखळी ते उपांत्य फेरीपर्यंत सर्व सामने मोठ्या उत्साहात पार पडले.विजेत्या संघाच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत उत्कृष्ट संघभावना दाखवली. अंतिम फेरीत मंत्रा क्रिकेट क्लबने प्रभावी गोलंदाजी आणि संयमी फलंदाजीच्या जोरावर सामना आपल्या बाजूने खेचला.स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि व्यक्तिगत पुरस्कारांचे वितरण स्थानिक उद्योजक व क्रिकेटप्रेमी राजू गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी सर्व खेळाडूंना प्रगतीपथावर अधिक मेहनत घेण्याचे आवाहन केले. पहिल्या वर्षीच “रामशेठ ठाकूर कप” स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आयोजकांनी आगामी काळात ही स्पर्धा आणखी भव्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे.


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image