खोपोली भाजप उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट-पक्ष ध्येय ,धोरण संघटनात्मक मार्गदर्शनासह पक्ष प्रवेश
प्रतिनिधी(प्रतिनिधी) खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या माध्यमातून भारतीय जनता महायुतीच्या सर्व उमेदवारांनी भाजप निवडणूक निरीक्षक अँड.प्रकाश बिनेदार यांच्या माध्यमातून निवडणुकी अंती पक्ष संघटना सक्षम व मजबूत करण्याचा निर्धार करीत आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची मार्गदर्शन रुपी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या महायुतीतील लढतीबाबत विविध विषयांना हात घालत उपस्थित सर्वांचे प्रोत्साहन रुपी मनोबल वाढवले. भाजपच्या सर्व उमेदवारांचे व त्यांना निरीक्षक म्हणून नियोजनबद्ध मार्गदर्शन करणारे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,अँड. प्रकाश बिनेदार, सुनील घरत व सय्यद अकबर आणि सर्व सहकारी वर्गाचे विशेष कौतुक केले. यावेळी आपण सर्वांनी हि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आदर्श समोर ठेवून महिन्यातून एकदा तरी पक्षाच्या माध्यमातून जनसंवाद,चर्चा व्हावी व संघटनात्मक वैचारिक बळ मिळावे या उद्देशाने मन की बात सारखे कार्यक्रम घ्यावे, जनेतच्या मनात भाजप पक्षाच्या सकारात्मक विचारांना पोहचविण्याचा प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. आपण सर्वांनी या पुढे शहराच्या विविध प्रभागातील उपक्रमांत पक्षाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होत सक्षम संघटना उभारावी असे सांगत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी शुभेच्छा रुपी मार्गदर्शन करताना शहर व जिल्हा कार्यकारणी मध्ये आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायचे असल्याचे सांगत पार पडलेल्या निवडणुकीत यशस्वी नियोजना सारखेच भाजप पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करूया असे सांगितले.
खोपोली भाजप महायुतीच्या सर्व उमेदवारांनी भाजप निवडणूक निरीक्षक अँड.प्रकाश बिनेदार व सर्व सहकाऱ्यांची विशेष कौतुक करीत पक्ष संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होत शहरात अनेकांचे पक्ष प्रवेश होणारं असल्याचे सांगत प्रभाग ०५ मधून अभिषेक कासार व प्रभाग ११ मधून अमान शेख यांच्या सह शहरातील विविध कार्यकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केले. पूर्ण ताकतीने निवडणूक लढविण्याचा बळ देण्यासाठी सर्वांच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभल्याने सर्वांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे विशेष आभार मानले.यावेळी सर्वांनी पनवेल भाजप कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पुष्प अर्पण करून घोषणा देत अभिवादन केले.
यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर, भाजप खोपोली शहर अध्यक्ष अजय इंगुळकर, शहरातील ज्येष्ठ नेते इंदरमलशेठ खंडेलवाल, रायगड जिल्हा सदस्या रसिका शेट्ये, माजी नगरसेवक रमेश रेटरेकर, महिला शहराध्यक्ष अश्विनी अत्रे, जिल्हा सदस्या स्नेहल सावंत, भाजप शहर मंडळाचे संजय म्हात्रे,अपर्णा साठे, नामदेव मोरे, संदेश पाटील, निलेश दळवी तसेच भाजप महायुतीतून उमेदवारी लढविणारे पदाधिकारी, विक्रम साबळे, सोनिया रुपवते, सानिया शेख, किशोर पाटील ,संजय तन्ना, प्रतीक्षा रेटरेकर, सुजाता मोरे व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.