पनवेलमधील रात्र शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
पनवेल/प्रतिनिधी,दि.२६- आज पनवेलमधील रात्र शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.रायगड जिल्ह्यातील एकमेव असलेली रात्रशाळा के.आं.बांठीया माध्यमिक विद्यालय आणि एम.एन.पालीवाला ज्युनिअर कॉलेज नवीन पनवेल येथे भरते.या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी आज २६ नोव्हेंबर हा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक देठे सर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,तर साबळे सर,रणदीवे सर,डोंगरदीवे सर व शाळेचे सन्माननीय लेखनिक आणि जनसभा वृत्तपत्राचे संपादक आप्पासाहेब मगर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सन्माननीय रणदीवे सर आणि डोंगरदीवे सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून संविधान दिनाचे व संविधानाचे महत्व पटवून सांगितले.याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी सुद्धा संविधान दिनाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाच्या शेवटी २६/११/२००८ रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबई वरती केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय रणदिवे सरांनी आपल्या अमोघ आणि प्रभावी वाणीने केले.



