ज्येष्ठ पत्रकार संजय कदम व आप्पासाहेब मगर यांची वंदे मातरम 150 व्या वर्धापनदिन शासकीय तालुकास्तरिय समितीवर नियुक्ती

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम व आप्पासाहेब मगर यांची वंदे मातरम 150 व्या वर्धापनदिन शासकीय तालुकास्तरिय समितीवर नियुक्ती


पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1857 साली लिहिलेल्या वंदे मातरम या गीतास स्वातंत्र्य लढयात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनन्ययाधारण महत्व प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तृतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य लढयातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेरणादायी ठरलेले आहे. या गीतास दिनांक. 07 नोव्हेंबर, 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्ताने शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाचे यशस्वी आयोजनासाठी अपर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय समिती स्थापन करण्यात येत आहे. यामध्ये पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम व खारघर येथील ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कमिटीमध्ये अप्पर तहसीलदार पनवेल जितेंद्र इंगळे हे अध्यक्ष, गटविकास अधिकारी समीर वाठारकर सदस्य, सहा.आयुक्त कौशल्य विकास मोहसीन वस्ता, प्रतिनिधी, सदस्य गटशिक्षणाधिकारी शाहू सकपाळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पिल्ले सर, महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे प्राधिकृत प्रशिक्षण संस्था, प्रतिनिधी योगेश पाटील, अध्यक्ष व ज्योती लोहार सचिव, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, शिक्षण संस्था प्रतिनिधी वाय.टी.देशमुख व राजेंद्र पालवे, संत श्रीकांतजी महाराज मोहोकर, क्रिडापटू प्रसाद ढवळे, विवेक सावंत, साहित्यिक गणेश म्हात्रे, सुनिता खरे, पत्रकार संजय कदम, आप्पासाहेब मगर, गडकिल्ले संवर्धन समिती सदस्य सागर मुंढे, प्रतिक चाचड, उद्योजक प्राग्वंश पाटील, संदीप मोहिते, महिला बचत गट प्रमुख अंजली इनामदार, स्वाती पवार, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी जाणीव एक सामाजिक संस्था, पनवेल, जागृती मित्र मंडळ, केदार भगत मित्र मंडळ व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजय तिकोले आदी मान्यवर या समितीमध्ये सहभागी असल्याची माहिती अप्पर तहसीलदार पनवेल जितेंद्र इंगळे यांनी दिली.