'संगीत मॅरेथॉन'मधून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याला स्वरबद्ध सलामी

  'संगीत मॅरेथॉन'मधून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याला स्वरबद्ध सलामी 




पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज पनवेलमध्ये 'उत्कर्ष संगीत मैफिल' तर्फे ‘संगीत मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात ७५ गायकांनी एकापाठोपाठ ७५ सुमधुर गाणी सादर करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याला स्वरबद्ध सलामी दिली. 
          राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य देणारे, जनतेच्या मनात घर करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे एक थोर समाजसेवक म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी सामाजिक कार्याची अखंड परंपरा जपली असून आजही ती तितक्याच जोमाने त्यांचे सामाजिक सुरू आहे. त्यामुळे या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर याचे अखंड सामाजिक कार्य अधोरेखित करण्यात आले. गायक गोपाळ पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य कार्यक्रम पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या संगीत मॅरेथॉन मध्ये सकाळी ११.३० वाजल्यापासून सलग साडेसात तास मराठी व हिंदी गाण्यांचे सादरीकरण झाले. गायक गोपाळ पाटील यांच्यासह उरण, पनवेल आणि नवी मुंबई येथील ७५ गायकांनी गाण्याचे सादरीकरणे केले. या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर आगमनाच्या वेळी गायक रवी नाईक यांनी ‘रामजी की निकली सवारी’ हे गाणे सादर केले. त्या सुरेल सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चंद्रकांत घरत, रविनाथ पाटील, ब्रिजेश पटेल, नरसू पाटील, एकनाथ ठाकूर, नरेश रहाळकर, भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक रविंद्र भगत, ऍड. नरेश ठाकूर, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, सिमा घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, समीर कदम, दीपक शिंदे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
          लोकनेते रामशेठ ठाकूर हे राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात. गेली पाच दशकाहून अधिक काळ त्यांनी सामाजिक कार्याची अखंड परंपरा जपली आहे आणि हे कार्य त्यांच्याकडून अखंडपणे सुरूच आहे. यंदा त्यांनी आपल्या वयाच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने पूर्ण वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रमे होणार होत आहेत. या सामाजिक उपक्रमांच्या मालिकेतच ‘संगीत मॅरेथॉन’ हा सांस्कृतिक सोहळा  एक सुरेल मेजवानी ठरली. 
         या संगीत मॅरेथॉनमध्ये गोपाळ पाटील, रवी नाईक. दक्षता स्वरूप, आकांक्षा भोईर, संगिता डे, नरेश पाटील, महेंद्र पारधी, भरत जैन, राजा भोसले, हरीश मोकल, गिरीश महाडिक निना कोटियन, गिरीश गुप्ता, सुशील देशमुख, सोनल जाधव, जगन्नाथ नलावडे, कविता इंगळे, जाहिदा, पी.सी.म्हात्रे, अश्विनी परब, श्री. कमलेश, सुनिता सकपाळ, सूभेन्दू डे, समता मोदी, सारंग मोदी, शानू, शिवानी उरणकर, रुची पाटील, मनोहर पाटील, ब्रिजेश रावत, शोमा गांगुली, महेंद्र तांडेल, प्रतिभा राठोड, स्वाती पांचाळ, आनंद कांबळे, राजेंद्र ठाकूर, सतिश गवई, बी. आर. पाटील, रमेश चाफे, कविता चाफले, संतोष चाफले, डॉ. सुभाष पाटील, भालचंद्र पाटील, त्रिशा, कीर्ती, वैयजंती महामुनी, सबिता, सुचित्रा जाधव, नम्रता गोडसे, राजेश मेमन, श्री. मनोहर, श्री. कैलास, गणेश पाटील, श्री. जयदेव, दिनेश पाटील, कुलबीर सिंग, मिता सोधी, रुची सारंगी, चारू मिश्रा, राहील शेख, राजानी पौल, विद्या भंडारी, रवींद्र सेठिया, बलदीप सिंग, खदिजा हार्नेसवाला, भरत ठक्कर, अनिता राव, शालिनी कौशिक, गीता आनंद, ए. आर. गणपथी, राजेश नंदराजन, कादंबरी सपकाळ, संदीप परुळेकर, मालिनी सिवाकुमार, निर्मला नायडू, दर्शन जाधव, डॉ. तृप्ती, महेश चव्हाण, विवेक चंद्रा या गायकांचा समावेश होता.या सुरेल मॅरेथॉनमध्ये प्रभू श्रीराम, भारतीय संस्कृती, देशभक्ती, कोळीगीते तसेच चित्रपटातील गाण्यांची मनमोहक मेजवानी सादर करण्यात आली. पनवेलकरांसाठी हा सांस्कृतिक सोहळा एक सुरेल पर्वणी ठरला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन हरीश मोकल आणि शोभा मॅडम यांनी केले. 

  कोट-
संगीत हे मनाला जोडणारे माध्यम आहे. गोपाळ पाटील यांनी चांगल्या गायकांचा संघ तयार केला आहे. अशा उपक्रमामुळे कलाकारांना वाव मिळणार आहे. आणि त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. माझ्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व गायकांचे आणि टीमचे मनःपूर्वक आभार ! -  लोकनेते रामशेठ ठाकूर