पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांमध्ये होणार दैनिक बाजार
पनवेल/प्रतिनिधी,दि.१३-पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती – अ(खारघर), ब (कळंबोली),क (कामोठे) , ड( खारघर) मधील विविध भुखंडांवर दैनिक बाजार बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सिडको प्राधिकरणाकडुन दैनिक बाजार बांधकामाकरीता भूखंड उपलब्ध झाले आहे. सदर भुखंडांवर बऱ्याच काळापासून तात्पुरत्या बांधकामासह बाजारपेठा सुरु आहेत. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार याठिकाणी नव्याने कायम स्वरुपी बांधकाम करुन दैनिक बाजार बांधण्याचे प्रस्तावित आहे. ज्यामुळे नागरिकांना बाजारांची चांगली व सहजपणे व सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहे.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खारघर प्रभाग अ मध्ये सेक्टर 3,4,6,11,12,15 व 20 मधील एकुण 15 ठिकाणी गरजेनूसार विविध ओटेसंख्या असलेले दैनिक बाजार बांधण्यात येणार आहे. या दैनिक बाजारांसाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देखील मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत प्रशस्त, रेखीव असे दैनिक बाजार उपलब्ध होणार आहेत.
याप्रमाणेच कळंबोली प्रभाग ब मध्ये सेक्टर 2,2ई, 5ई, 6, 10,12, 14,15 मध्ये 16 ठिकाणी गरजेनूसार ओटेसंख्या असलेले दैनिक बाजार बांधण्यात येणार आहे. या दैनिक बाजारांसाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देखील मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन कळंबोली प्रभागातील नागरिकांच्या सेवेत सुव्यवस्थित प्रशस्त असे दैनिक बाजार उपलब्ध होणार आहेत.
याप्रमाणे कामोठे प्रभाग समिती क मध्ये सेक्टर 17मध्ये 38 ओटे , सेक्टर 21 मध्ये 14 ओटे, सेक्टर 18मध्ये 46 ओटे , सेक्टर 10मध्ये 14 ओटे अशा पाच ठिकाणी दैनिक बाजार बांधण्यात येणार आहेत. या दैनिक बाजारांसाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देखील मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन कामोठे प्रभागातील नागरिकांच्या सेवेत प्रशस्त असे दैनिक बाजार उपलब्ध होणार आहेत.
याप्रमाणेच पनवेल प्रभाग ड मध्ये सेक्टर 6, 1एसई, 2 ई, 3 ई, 4ई, 7 डब्लू,8डब्लू, 10 डब्लू़ 5ए, 5 मधील 10 ठिकाणी गरजेनूसार ओटेसंख्या असलेले दैनिक बाजार बांधण्यात येणार आहे. या दैनिक बाजारांसाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देखील मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन पनवेल प्रभागातील नागरिकांच्या सेवेत सर्व सोयी सुविधांनी युक्त असे प्रशस्त असे दैनिक बाजार उपलब्ध होणार आहेत.