पनवेल- वलप रस्त्याची दुरावस्था लवकरच संपणार-मा.नगरसेविका प्रज्योती म्हात्रे

पनवेल- वलप रस्त्याची दुरावस्था लवकरच संपणार-मा.नगरसेविका प्रज्योती म्हात्रे 



पनवेल/प्रतिनिधी,दि.९-यंदाच्या पावसाळ्यात पनवेल- वलप रस्त्याची अवस्था कधी-नव्हे इतक्या वाईट परिस्थितीतून जात आहे.रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे ओळखणे कठीण झाले आहे. टेभोडे बसस्टॉप समोर तसेच गणेशनगर वलपच्या समोर रस्ता इतका खराब झाला आहे की तीकडे रिक्शावालेही फीरकायला तयार नाहीत.तळोजा एम.आय.डी.सी.ला शॉर्टकट म्हणून अनेक कामगार या रस्त्याचा वापर करतात.परंतु गेल्या काही दिवसांपासून रस्त्याची दुर्दशा पाहून कामगार आणि नागरिक हैराण झाले आहेत.

      स्थानिक नगरसेविका प्रज्योती म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याला चांगले दिवस येणार असल्याचे भाष्य त्यानी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर केले.यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सुद्धा पत्रव्यवहार करून जनतेची कैफियत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनकडे मांडली होती.पण काल त्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकाऱ्यांनी खराब रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचे मान्य केले आहे.तसेच ते येत्या आठ दिवसांत कामाला सुरुवात करणार आहेत. 

        या बैठकीला प्रज्योती म्हात्रे यांच्या सह शेकाप जिल्हा महानगर चिटणीस प्रकाश म्हात्रे,शेकाप नेते ज्ञानेश्वर मोरे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.